सौभाग्य लक्ष्मी ठेव योजना

कालावधी : 24 महिने.

सदर ठेव योजना मकर संक्रांती दिवशी सुरू करण्यात आली असून, महिलांबरोबर आता सर्वांसाठी ही ठेव योजना खुली करण्यात आली आहे

व्याज दर:

ज्येष्ठ नागरिकांना: 9.50%

नागरिकांना:  9.25%

नियम व अटी:

ज्यादा व्याज दराची ठेव असलेने मुदत पूर्व 3% व्याजाने परत.

सदर ठेवीवर 80% कर्ज देण्याची सुविधा

तिमाही व्याज नाही. मुदतीनंतर व्याजासह ठेवीची रक्कम दिली जाते.

बचत ठेवी (सेव्हींग्ज)

सर्व बचत खात्यास के.वाय.सी. अंतर्गत खालील पुरावे आवश्यक:

व्याज दर: 3 %

1.    ओळखीचा पुरावा (खालीलपैकी एक)

मतदानकार्ड झेरॉक्स

आधारकार्ड झेरॉक्स

ड्रायव्हींग लायसेन्स

पासपोर्ट झेरॉक्स

शासकीय ओळखपत्र

नरेगा कार्ड झेरॉक्स

2.   रहिवासी पुरावा (खालीलपैकी एक)

रेशनिंग कार्ड झेरॉक्स

विजबील झेरॉक्स

टेलिफोन बील झेरॉक्स

ग्रामपंचायतीचा दाखला

इतर अधिकृत दाखला

नियम व अटी:

प्रारंभी रु. 100 जमा करणे आवश्यक

एका व्यक्तीस एकच खाते उघडता येईल.

संयुक्त खाते उघडता येईल.

खात्यावर किमान शिल्लक रु. 100 आवश्यक

खाते उघडताना ओळख आवश्यक राहिल. ओळख देणारा खातेदार असावा.

खात्यासाठी के.वाय.सी. बंधनकारक, ओळखीचा पुरावा,रहिवासी पुरावा, 2 फोटो

आठवड्यातून फक्त 2 वेळा रक्कम काढता येईल (वर्षातून 100 वेळा)

व्याज आकारणी 1 तारखेपासून महिना अखेरपर्यंत कमीत कमी बॅलन्सवर केली जाईल.

पासबुक हरविल्यास किंवा खाते 1 वर्षाचे आत बंद केल्यास रु. 10 आकारण्यात येतील.

रक्कम काढताना पासबुक हजर करणे आवश्यक राहील.

नामनिर्देशन करणे गरजेचे.

दाम दुप्पट ठेव खाते

कालावधी: 8 वर्षे  9 महिने

व्याज दर:7.50% तिमाही चक्रवाढ व्याज

नियम व अटी:

ज्यादा चक्रवाढ व्याजाची ठेव असल्याने कालावधी 8 वर्षे 9 महिने राहील

सदर ठेवीवर 80% कर्ज देण्याची सुविधा

मुदतपूर्व ठेव परत करताना त्या त्या कालावधीसाठी असणाऱ्या व्याजदरातून 1% कमी

दामदिडपट ठेव

कालावधी: 5 वर्षे 2 मेहिने

व्याज दर:7.50% तिमाही चक्रवाढ व्याज

नियम व अटी:

मुदती नंतर दिडपट रक्कम मिळणार

सदर ठेवीवर 80% कर्जसुविधा

मुदत पूर्व ठेव परत करताना त्या त्या कालावधीच्या व्याजदरातून 1% कमी

पेन्शन ठेव

पेन्शन ठेव योजना [ कालावधी 3 वर्षे ]
रक्कम नागरिकांना ज्येष्ठ ना.
रु. 10000 Rs 67 Rs 69
रु. 25000 Rs 167 Rs 172
रु. 50000 Rs 333 Rs 344
रु. 100000 Rs 667 Rs 688
रक्कम 1 वर्षे 2 वर्षे 3 वर्षे
नागरिकांना ज्येष्ठ ना. नागरिकांना ज्येष्ठ ना. नागरिकांना ज्येष्ठ ना.
7% 7.25% 7.50% 7.75% 8% 8.25%
10000 58 60 63 65 67 69
25000 146 151 156 161 167 172
50000 292 302 313 323 333 344
100000 583 604 625 646 667 688

व्याज दर:

ज्येष्ठ नागरिकांना:  8.25%

नागरिकांना:  8%

नियम व अटी:

दरमहा निश्चीत रक्कम मिळणेसाठी सदरची योजना आहे.

ज्येष्ठ नागरिकांना फायदेशीर.

ठेवीवर 80% कर्ज सुविधा.

कर्ज घेतलेनंतर मासिक पेन्शन कर्जात जमा होते.

लोकमंगल ठेव

1.    महिने मुदत: 6 महिने

व्याज दर:3.50%

2.    महिने मुदत:1 वर्षे आणि पुढे

व्याज दर:6%

(लोकमंगल एजंटमार्फत ठेवी संकलन)

नियम व अटी:

दैनंदिन बचत करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांसाठी उपयुक्त.

मुदतीपूर्वी खाते बंद केल्यास 2% दंड आकाराला जाईल.

सदर ठेवीवर 80% कर्ज देण्याची सुविधा.

ठेवीदारास घरपोच सेवा देवून ठेवी जमा करण्याचा उद्देश

जिजामाता रिकरिंग ठेव  (सदर योजना स्थगित केलेली आहे)

रुपये 1वर्षे(8%) 2वर्षे(8.50%) 3वर्षे(9%) 4वर्षे(9%) 5वर्षे(9%)
रु. 100 रु. 1252 रु. 2612 रु. 4100 रु. 5682 रु. 7372
रु. 200 रु. 2504 रु. 5224 रु.8200 रु.11364 रु.14744
रु. 500 रु.6260 रु.13060 रु.20500 रु.28410 रु.36860
रु. 1000 रु.12520 रु.26120 रु.41000 रु.56820 रु.73720
रु. 5000 रु.62600 रु.130600 रु.205000 रु.284100 रु.368600

व्याज दर:    8% 13 महिन्यांसाठी, 8.50% 25 महिन्यांसाठी

मुदतीच्या ठेवी

व्याज दर:

कालावधी इतर ज्येष्ठ ना.
कॉल डिपॉझिट (15 दिवसांचे पुढे) 6% 6%
30 ते 90 दिवस 5.50% 6%
91 ते 180 दिवस 6% 6.25%
181 ते 1 वर्षापेक्षा कमी 6.25% 6.50%
1 वर्ष ते 2 वर्षापेक्षा कमी 7.00% 7.25%
2 वर्ष व त्यापुढे 7.50% 8.00%

नियम व अटी:

मुदत पूर्व ठेव परत करताना त्या त्या कालावधीसाठी असणाऱ्या व्याजदरातून 1% कमी करून परत.

ठेवीवर 80% कर्जाची सुविधा

लक्षाधीश ठेव योजना

व्याज दर:8.50%

अ. क्र. प्रति महिना रक्कम मुदत कालावधी अंशदायी रक्कम
1 रु. 2440 3 वर्षे रु. 1 लाख
2 रु. 1760 4 वर्षे रु. 1 लाख
3 रु. 1360 5 वर्षे रु. 1 लाख

नियम व अटी:

नियमित मासिक बचतीने मुदतीनंतर रु. 100,000 मिळणेसाठी योजना

मुदती पूर्वी खाते बंद केल्यास 3% व्याजदर राहील.

एका शाखेतून दुसऱ्या शाखेत खाते वर्ग करता येईल

हप्ता भरण्यास विलंब झाल्यास दरमहा शेकडा 1.50% डिफॉल्ट

सदर ठेवीच्या तारणावर 80% कर्ज देण्याची सुविधा.

कालावधी 3 वर्षापासून 10 वर्षापर्यंत राहील.

स्वयं सुरक्षा योजना

नियम व अटी:

या योजनेमध्ये तुम्हाला एकदा ५७० रु. गुंतवावे लागतात .आणि या योजनेतून तुम्हाला वयाच्या ६५ वर्षे पर्यंत ५०००० रु . अपघात संरक्षण मिळेल.

मुदतीनंतर तुम्हाला ५०० रु. परत मिळतील.

अपघात कोणत्याही प्रकारचा असू शकतो.

चालू ठेव योजना

नियम व अटी:

प्रारंभी रु. 500 जमा करणे आवश्यक

एका व्यक्तीस एकच खाते उघडता येईल.

संयुक्त खाते उघडता येईल.

खात्यावर किमान शिल्लक रु. 500 आवश्यक.

खाते उघडताना ओळख आवश्यक राहिल. ओळख देणारा खातेदार असावा.

खात्यासाठी के.वाय.सी. बंधनकारक, ओळखीचा पुरावा,रहिवासी पुरावा, 2 फोटो

आपण / 50000 खाली कमाल काढू शकतात - दररोज रोख.

कोणत्याही व्याज ही योजना देण्यात येईल.

पासबुक हरविल्यास किंवा खाते 1 वर्षाचे आत बंद केल्यास रु. 10 आकारण्यात येतील.

रक्कम काढताना पासबुक हजर करणे आवश्यक राहील.

नामनिर्देशन करणे गरजेचे.

व्यापारी मित्र कर्ज योजना

सदर योजना फक्त व्यापारी वर्गासाठी राहील.

कर्जदार पात्रता / निकष :

शाखा कार्यक्षेत्रात किमान ३ वर्षापेक्षा जास्त वर्षापासून ट्रेडींग निगडीत व्यवसाय असावा.

संस्थेचा सभासद असावा व के वाय सी पुर्तता असलेले बचत वा लोकमंगल ठेव खाते असावे.

व्यवसायातील मालाची विक्री (Turnover) नुसार ८/४/१.५ पट असावी.

कर्ज मर्यादा

जास्तीत जास्त रु. ५,००,०००/- लाख पर्यंत.

व्याजदर

- द. सा. द. शे. १३.५० टक्के, प्रोसेस फी २ टक्के, शेअर्स कपात ५ टक्के.

मुदत कालावधी

कर्जाची परत फेड मुदत जास्तीत जास्त ८४ महिने इतकी राहील.

कर्जाच्या प्रमुख अटी -

व्यवसायाची संपूर्ण माहिती, लायसन्स व परवाना प्रत तसेच गत तिन वर्षाचे ताळेबंद व नफा तोटा पत्रक इन्कम टॅक्स असेंसमेंट ऑर्डर असणे आवश्यक.

कर्जास घर, प्लॉट, फ्लॅट वा शॉप, इ कर्ज रक्कमेच्या दुप्पट किंमतीची तत्सम स्थावर मालमत्ता स्वखर्चाने गहाणखत व बोजा नोंद करून तारण देणे आवश्यक.

व्यवसायातील शिल्लक माल हायपोथिकेटेड करणे आवश्यक.

कर्जदार यांचे चालू बॅंक खात्याचे किमान ५ पोस्ट डेटेड चेक्स सह्या करून देणे आवश्यक.

तसेच व्यावसायिक कर्जाच्या इतर नियम व अटींची पूर्तता करणे आवश्यक.

वसुलीकरीता कर्जदार सभासदाने लाखास १०० च्या पटीत लोकमंगल कलेक्शन वा दैनिक वसुली सूरू करणे व ती शाखा एजंट वा सेवकाकरवे रोजचे रोज आणणे आवश्यक.

सदर कर्ज मागणी झालेपासून १० ते १५ दिवस इतका मंजूरी कालावधी राहील व कर्ज वितरणापूर्वी मुख्यालयाकडून मंजूरी पत्र घेणे आवश्यक.

वरील योजनेमध्ये प्रत्येक शाखेत २० लाख पर्यंत कर्ज वितरण होणे व १ लाख इतके भागभांडवल वाढ होणे अपेक्षीत आहे.

इझी कार लोन

कर्जदार पात्रता / निकष :

संस्थेचा सभासद असावा व संस्थेत किमान तिन वर्ष जूने के वाय सी पुर्तता असलेले बचत खाते असावे त्यावर नियमित व्यवहार असावेत.

उत्तम परतफेड क्षमता असावी.

कर्ज मर्यादा

खरेदी वाहनाचे ऑनरोड किंमतीच्या १०० टक्के पर्यंत व जास्तीत जास्त रु. १०,००,०००/- लाख पर्यंत.

व्याजदर

द. सा. द. शे. १२.५० टक्के, प्रोसेस फी १ टक्के, शेअर्स कपात २.५ टक्के.

मुदत कालावधी

कर्जाची परत फेड मुदत जास्तीत जास्त १०० महिने इतकी राहील.

कर्जाच्या प्रमुख अटी -

सभासदाने वाहन किंमतीच्या २० टक्के इतकी दुरावा रक्कम संस्थेमध्ये मुदत ठेवीत गुंतवणूक करणे आवश्यक

सभासदाचे व्यवसायाची /नोकरीची संपूर्ण माहिती तसेच किमान गत तिन वर्षाचे ताळेबंद व नफा तोटा पत्रक इनकम टॅक्स अससेसमेंट ऑर्डर व फॉर्म नं. १६A असणे आवश्यक.

कर्जास खरेदी केलेले वाहन तारण राहील त्यावर कर्जदार सभासदाने स्वखर्चाने आर. सी. बुक व इन्शोरन्स सिरिफिकेटवर एच. पी. नोंद करून मूळ कागदपत्रे व डुप्लिकेट चावी संस्थेकडे देणे आवश्यक. .

कर्जदार यांचे चालू बँक खात्याचे किमान १२ पोस्ट डेटेड चेक्स सह्या करून देणे आवश्यक. .

सदर कर्ज मंजुरी विभागीय अधिकारी यांचे अधिकारात शाखा स्तरावर करावयाचे असून वितरणानंतर मुख्यालयाची मंजुरी घेणे आवश्यक. .

वरील योजनेमध्ये प्रत्येक शाखेत किमान ५लाख पर्यंत १कर्ज वितरण होणे अपेक्षित आहे.

तसेच वाहन तारण कर्जाच्या इतर नियम व अटींची पूर्तता करणे आवश्यक.

वरील दोन्ही योजनांचे जास्तीत जास्त मार्केटिंग करून लाभार्थी सभासद ग्राहकांना कर्जपुरवठा करून आपले शाखेचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करणेचे दृष्टीने योग्य ती कार्यवाही करावी.

नवदिप ठेव योजना (सदर ठेव दि. 01/04/2020 पासून स्थगित केलेली आहे.)

कालावधी: 1 वर्षे मुदत

व्याज दर:10% सर्वांसाठी रक्कम फक्त 10,000/- चे पटीत घेतली जाईल

नियम व अटी:

ज्यादा व्याज दराची ठेव असलेने मुदत पूर्व 4% व्याजाने परत.

सदर ठेवीवर 80% कर्ज देण्याची सुविधा

तिमाही व्याज नाही. मुदतीनंतर व्याजासह ठेवीची रक्कम दिली जाते.

समृध्दी ठेव योजना (सदर योजना स्थगित केलेली आहे)

कालावधी:  ५ वर्षे मुदत

नियम व अटी:

रक्कम ५०००/- भरा व दरमहा  १०००/-फक्त ६० महिने भरून ७९,९५५/- मिळवा.

सदर योजनेत भाग घेणारा खातेदार संस्थेचा अ वर्ग सभासद व बचत ठेव खातेदार असावा.

सदर ठेव पावतीस मुदत ५ वर्षे राहील व त्यास व्याजदर ९.५ टक्के तिमाही चक्रवाढ व्याज पध्द्तीने लागू राहील.

सदर पावतीची मुदतपूर्ती रक्कम व्याजासह ७९,९५५/- मिळेल. 

सदरचे पावतीवरील ठेवतारण कर्जास व्याजदर २ टक्के जादा म्हणजे ११.५ टक्के राहील व कर्जास व्याजआकाराणी मासिक पध्द्तीने राहील.

समृद्धी ठेवतारण रु.४५,०००/- कर्जाची परतफेड ग्राहकाने दरमहा रक्कम रुपये १,०००/- प्रमाणे ६० महिने भरून करावयाची आहे.

सदर ठेव ही १ वर्षाचे आत बंद करता येणार नाही.

सदर ठेवीस मुदत पूर्व बंद करणेची झालेस त्यास मुदत ठेवीप्रमाणे नियम लागू राहतील.

ठेवतारण कर्ज ग्राहकाने एकरकमी भरून खाते निरंक केले तरी चालेल. त्यावर नियमाप्रमाणे व्याज आकारणी करून ठेव पावती ग्राहकास परत मिळेल.

सदर ठेव योजना दि. ०१/०१/२०१९ ते ३१/०१/२०१९ या मर्यादित कालावधीसाठीच चालू राहील. याबाबतचे सर्व हक्क संस्थेने राखुन ठेवले आहेत.

अरूणोदय ठेव योजना

कालावधी : 15 महिने.

 लघु मुदतीची ठेवी मिळविण्यासाठी सदरची योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना ग्राहकांमध्ये अत्यंत लोकप्रिय झालेली आहे.

व्याज दर:

ज्येष्ठ नागरिकांना: 9.00%

नागरिकांना:  9.00%

नियम व अटी:

ज्यादा व्याजाची ठेव असल्याने मुदतपूर्व 3% व्याजदर

ठेवीवर 80% कर्ज देण्याची सुविधा

मुदतीनंतर व्याजासह रक्कम परत दिली जाते.

सुपर सिक्स ठेव योजना (सदर योजना स्थगित केलेली आहे.)

मुदत सुपर सिक्स ठेव योजनेमध्ये ६ महिने मुदतीचे रिकरिंग ठेव खाते राहील.

व्याज दर:

सदर योजनेचा व्याजदर ८. ०८% देण्यात येईल.

६ महिन्यांची जमा रक्कम व देय व्याज ग्राहकास मिळेल.

६ महिने मुदतीनंतर सर्व देय रक्कम पुन्हा ६ महिने मुदतीत पुनर्गुंतवणूक केलेस त्यावेळच्या असणाऱ्या व्याजदरापेक्षा १% जादा व्याजदर राहील.

सुपरसिक्स ठेवयोजनेमध्ये कमीतकमी रु. ५००/- चे ठेव खाते आवश्यक.

 

सदर योजनेचा तपशिल पुढीलप्रमाणे

अ.नं दरमहा भरावयाची रक्कम मुदतीनंतर मिळणारी रक्कम
1 500 3071
2 1000 6142
3 1500 9213
4 2000 12284
5 5000 30711
6 10000 61422

नियम व अटी:

सदर चे ठेव खाते मुदतीपूर्वी बंद केलेस ४% दराने व्याज दिले जाईल.