कोल्हापूर येथील यशवंत नागरी सहकारी पतसंस्थेचे विलिनीकरण झाले तरी कर्जदार व ग्राहक यांनी छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेस सहकार्य केल्याबद्दल त्यांचे निवासस्थानी जावून ग्राहकांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार देवून यथोचित सत्कार करण्यात आला. 85 वर्षीय वयोवृध्द मार्गदर्शक श्री. दादा टोपकर, ग्राहक व हितचिंतक श्री. संजय घाटगे (मामा), सौ. व श्री. जितेंद्र सखळकर यांचा सन्मान करताना संस्थेचे अधिकारी बी. जी. पतंगे, भानुदास लेंभे. "छत्रपती' संस्थेच्या गौरवामुळे ते भारावून गेले.
कोल्हापूर येथील अडचणीत आलेल्या यशवंत नागरी सहकारी पतसंस्थेचे विलीनीकरण करून घेवून दि. 18-12-2009 रोजी मोठ्या दिमाखात छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेची कोल्हापूर येथे शाखा सुरू करण्यात आली आहे. अनेक कारणांनी अडचणीत आलेल्या अनेक पतसंस्थांचे विलिनीकरण करून सहकाराचे शुद्धीकरण करण्याचे काम छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेने करून मूळ ठेवीदारांना ठेवी परत करून दिलासा देण्याचे काम केले आहे. अडचणीत आलेल्या मूळ संस्थेतील ठेवीदारांचे पैसे न बुडवता "छत्रपती' संस्थेने ठेवीदारांना नवसंजीवनी देण्याचे काम करून सहकारी श्रेत्रात आदर्श निर्माण केला आहे.
कोल्हापूरातील बहुतांश सहकारी पतसंस्था व बँका अडचणीत आल्याने व्यवसायास संधी मिळेल का याबद्दल शंकाच होती. परंतु करवीरवासीयांच्या सहकार्याने गेल्या 5 वर्षात शाखेने दैदिप्यमान अशी प्रगती करून आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
कोल्हापूर येथील यशवंत सहकारी पतसंस्थेचे विलिनीकरण करून घेतल्यानंतर कोल्हापूर सारख्या प्रगतीशिल शहरामध्ये प्रथमत: विश्वास संपादन करण्याची गरज निर्माण झाली. त्यामुळे फक्त व्यवसायावर भर न देता अडचणीतील ठेवीदारांना दिलासा देणे महत्वाचे होते.
संस्थेने प्रथम "यशवंत'च्या ठेवीदारांना 60 कोटी रुपये ठेवी परत करून ग्राहकात चैतन्य निर्माण केले. त्यानंतर विविध ग्राहकांना सभासद होण्यास प्रवृत्त करून ग्राहकात चैतन्य निर्माण केले. त्यामाध्यमातून ठेववाढ करणे सुलभ झाले. विविध आकर्षक ठेव योजनांमुळे ग्राहक संस्थेकडे आकर्षित होवून हितचिंतक झाले.
दुर्बलांना सबल करण्यासाठी वचनबद्ध असलेल्या छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेने कोल्हापूर नगरीमध्ये नियोजनबद्ध कारभार सुरू केला. कोल्हापूर येथे वसूलीची अवस्था भयानक असताना संस्थेने धाडस करून योग्य कर्जदाराची निवड करून कर्ज वितरण केले. या सर्व कर्जाची वसूली नियमीत आहे.
By taking “Vina Sahakar Sahi Udhar” quotation saying in front of eye, Chhatrapati Group’s Director Mr. Rambhau Lembhe, Mr. Sureshrao Salunkhe, and Mr. Ashokrao Lembhe have started this organization. Along with their friends on 13 September 1989, they established this organization with the holy name of ‘Sambhaji Maharaj’.
Tal. Koregaon has been recognized as drought region in the Satara district. And Pimpode Brudruk was not exception to that in Koregaon. Agriculture production was not done, farmer had been trapped in money lending, and stagnation was increased.
At the beginning, we have opened 101 women’s account with Rs. 10 minimum amount. Starting fund was Rs. 40000.
Today 210 servants and 100 Lokmangal agents are working in this organization. Even during bad situation of organization they had maintained the trust of their customers and depositors. As they are going towards the development of the organization successfully.
आज सर्वच क्षेत्रात पुरूषांचे बरोबरीने महिला खांद्याला खांदा लावून काम करत असून, महिलांमध्ये प्रामाणिकपणा, कष्टाची सवय, कुटूंबाच्या प्रपंचास हातभार लावण्याची मनिषा, बचतीची सवय हे चांगले गूण उपजतच असल्याने महिला सबलीकरण ही संस्थेची संकल्पना असून "दुर्बलं त्रायते नित्यम' या बोधवा्नयानुसार संस्थेने महिलांना सुक्ष्म कर्जपुरवठा (माय्रकोफायनान्स) करण्यास प्राधान्य दिले.
कोल्हापूरातील 15 महिला समूहांना जवळ जवळ 250 महिलांना 25 लाख कर्जपुरवठा केला असून महिलांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे महिला स्वयंरोजगार व बचत गट कर्ज वाटपाची अजिबात थकबाकी नाही ही विशेष बाब आहे.