पश्चिम महाराष्ट्रात अग्रगण्य असलेल्या छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेने नुकतेच आय. एस. ओ. नामांकन प्राप्त करून सहकारात झेप घेतली आहे. ही बाब सर्वांना अभिमानास्पद वाटावी अशी आहे. रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या या संस्थेच्या उत्तूंग कामगिरीबद्दल आंतरराष्ट्रीय नामांकन संस्थेने टाकलेली ही कौतुकाची थाप असून केलेल्या दैदिप्यमान कार्याची ही पोचपावतीच आहे.
संस्थेचे संस्थापक, पदाधिकारी, संचालक मंडळ, सेवक वर्ग, सभासद, खातेदार, ठेवीदार, सल्लागार, हितचिंतक यांनी एकजुटीने केलेल्या कामावर खडज 9001 : 2008 नामांकन प्रदान झाल्याने छत्रपती संाभजी महाराज सहकारी पतससंस्थेचा दर्जा व गुणवत्ता यावर शिक्कामोर्तब झाले असून, आंतरराष्ट्रीय नामांकनाच्या राजमुद्रेची मोहर उमटणे ही बाब संस्थेचे ग्राहकांना निश्चीतच समाधान देणारी आहे. छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेने आपल्या कार्यातून नामांकनाची झेप घेतल्याने मराठी पाऊल पडते पुढे याची प्रचिती येऊ लागली आहे.
जर्मनी येथे मुख्य आंतरराष्ट्रीय मुख्य ऑफिस असलेल्या आय. एस. ओ. संस्थेच्या पुणे येथील जिनियस सर्टिफिकेशन संस्थेमार्फत पिंपोडे बुद्रुक, ता. कोरेगाव, जि. सातारा येथील छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंसस्थेचे "ग्राहकांचे समाधानाचा दर्जा' या निकषांवर गेले सहा महिन्यांपासून सातत्यपूर्ण सर्वंकष तपासणी करण्यात आली आहे. त्यानुसार आय. एस. ओ. नामांकनासाठी आवश्यक त्या धोरणांनुसार संस्थेचे सर्व रेकॉडिर्ंंगची तपासणी, संस्थेतर्फे ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सुविधा, संचालक मंडळामध्ये चर्चा करून खडज नामांकनासाठी शिफारस करण्यात आली आहे. सुरूवातीला खडज कंपनीचे जिनियस सर्टीफिकेशन प्रा. लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लटके यांनी कंपनीचे अधिकारी विवेक दिवेकर यांचे सहकार्याने छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेचे पहिले ऑडीट केल्यानंतर लटके साहेब यांचे मार्गदर्शनाखाली आय. एस. ओ. चे संपूर्ण कामकाज झालेले आहे.
दुसऱ्या ऑडीटसाठी सुबोध नंदन साहेब, ओम शंकर झा साहेब, विवेक दिवेकर साहेब यांची निवड करण्यात आली. या तिन्ही अधिकाऱ्यांनी आय. एस. ओ. नामांकनासाठी आवश्यक असलेल्या निकषांस अनुसरून वेळोवेळी संस्थेस भेटी देवून संस्थेचे अभ्यासपूर्वक गुणवत्ता धोरणाची तपासणी केली. छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेचे संपूर्ण रेकॉर्डींग सिस्टीमची पहाणी, संस्थेचे अंतर्गत लेखापरिक्षण, मॅनेजमेंट मिटींग, आय. एस. ओ. अनुसरून सर्वसेवकांचे 10 विषयांस अनुसरून प्रशिक्षण घेतले, संस्थेच्या सर्व बाबींचे सर्वेक्षण करून आर्थिक सुविधा, ठेवीदारांना सुविधा, लॉकर्स सुविधा, कर्जदारांना सुविधा, इतर सुविधा पाहून संस्था जास्तीत जास्त ग्राहकांना सुविधा देवून समाधान देत असल्याचे निकषांस पात्र होत असल्याची खात्री केली.
त्यानंतर खडज नामांकन संदर्भात ग्राहक समाधानाची टक्केवारी आणि गुणवत्तेचा दर्जा यासंदर्भात दुसऱ्या ऑडीटमध्ये नेमलेल्या वरील तिन्ही ऑडीटरनी दि. 29 सप्टेंबर 2014 रोजी संस्थेच्या मिटींग हॉलमध्ये संस्थचे पदाधिकारी, संचालक मंडळ, यांचेशी सकाळी एक मिटींग घेतली आणि दुपारी दुसरी एक मिटींग घेवून दि. 29 सप्टेंबर 2014 रोजी ऑडीटर सुबोध नंदन साहेब यांनी छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेस आय. एस. ओ. सर्टिफिकेशनची शिफारस केली.
आय. एस. ओ. चे अधिकारी सुबोध नंदन साहेब यांनी दि. 29 सप्टेंबर 2014 रोजी संचालक मंडळाचे मिटींगमध्ये संस्थेचे ग्राहक समाधानच्या सर्व मुद्यावर शेवटचा हात फिरवून ग्राहकांचे समाधान 90.26 टक्के गूण मिळाल्यामुळे छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेस आय. एस. ओ. नामांकन सर्टीफिकेट मिळण्याबाबत शिफारस करण्यात आली. संस्थेचा गुणवत्तापूर्ण दर्जा आणि ग्राहकांचे समाधानास पात्र ठरल्याने छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेस दि. 10 ऑ्नटोबर 2014 रोजी खडज 9001-2008 नामांकन सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले आहे. संस्थेच्या शिरपेचातील हा मानाचा तुरा संस्मरणीय ऐतिहासीक व सुशोभनीय असाच आहे.