संचालक मंडळ

प्रामाणिक व प्रशिक्षित सेवक संस्थेचे आधारस्तंभ

      पतसंस्था ही ग्रामीण भागातील जनतेची अर्थवाहिनी असून ग्रामीण भागातील गरीब लोकांना अर्थसहाय्य करून विकासाच्या वाटा दाखविणारी ही शेवटच्या स्तरातील संस्था आहे. ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या कमकूवत घटकातील गरीब जनतेला सावकारी पाशातून सोडविण्यासाठी पतसंस्थेचा जन्म झाला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 1985 ते 1990 या काळामध्ये ग्रामीण व शहरी भागामध्ये अनेक पतसंस्था निर्माण झाल्यामुळे ग्रामीण भागातील सावकारी बहुतांशी दूर झाली. परंतु कालांतराने अनेक पतसंस्था नियोजनाअभावी अडचणीत आल्या. त्यामुळे ठेवीदारांचे पैसे पतसंस्थेमध्ये अडकून राहिले. पतसंस्थामुळे ग्रामीण भागातील तरूणांना बऱ्यापैकी रोजगार उपलब्ध झाले. परंतु अनेक पतसंस्था अडचणीत आल्यामुळे बऱ्याच तरूणांना नोकरीपासून मुकावे लागले.

      पतसंस्थेमध्ये काम करणाऱ्या सेवकांना बँकिंगच्या कामाचा अनुभव नसतो. संचालकमंडळसुद्धा ग्रामीण भागातील असल्यामुळे त्यांना पतसंस्थेच्या अर्थकारणाचा अनुभव नसतो. त्यामुळे चुकीचे कर्जवाटप, राजकीय लोकांचा पतसंस्थेच्या कारभारात हस्तक्षेप यामुळे अनेक पतसंस्था अडचणीत आल्याचे दिसून येते. सध्याच्या बँकिंग क्षेत्रातील स्पर्धेच्या युगात पतसंस्था यशस्वी व्हायच्या असतील तर पतसंस्थेचा सेवक हा खालीलप्रमाणे असावा- :

  1. पतसंस्थेचा सेवक सुशिक्षित असावा, हल्ली सर्वच क्षेत्रात बारावीच्या पुढे शिक्षण अपेक्षीत असते. मग पतसंस्था त्याला कशा अपवाद असतील. सेवक सुशिक्षीत पदवीधर असेल तर त्याला दफ्तरी कामाची माहिती लवकर अवगत होते. तसेच ग्राहकाबरोबर बोलण्याची छाप पडते. सुशिक्षीत असल्याने अभ्यासू वृत्ती असते. त्यामुळे नवनविन येणाऱ्या संकल्पना राबवल्या जातात व त्यामुळे पतसंस्थेची प्रगती होण्यास मदत होत.
  2. पतसंस्थेचा सेवक हा प्रशिक्षित असावा. कुठल्याही संस्था, कंपनी असो तिचा सेवक हा प्रशिक्षित असणे महत्वाचे असते. आपल्या पतसंस्थेचा व्यवसाय कसा वाढावा, त्याचे नियम काय आहेत, कामकाज करत असताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे, दफ्तरी कामकाज कशा पद्धतीने केले पाहिजे या गोष्टीचे बारकावे हे प्रशिक्षणामधूनच मिळत असतात. म्हणून पतसंस्थेचा प्रत्येक सेवक हा प्रशिक्षित असलाच पाहिजे.
  3. सेवकांना संगणकीकरणाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. पतसंस्थेमध्ये ग्रामीण भागातील सेवक असल्यामुळे त्यांचेमध्ये संगणकीकरण ज्ञानाचा अभाव असतो. तसेच भितीपोटी किंवा अनास्था म्हणून संगणक ज्ञानाकडे पाहिले जाते. त्यामुळे स्पर्धेच्या युगामध्ये या पतसंस्था पाठीमागे रहातात व त्यांची प्रगती खुंटते. ग्राहकांचा पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा होतो व पतसंस्था अडचणीत येते. त्यासाठी प्रत्येक पतसंस्थेच्या सेवकास संगणकीकरणाचे ज्ञान असणे महत्वाचे आहे. संचालक मंडळाने सेवकांना साक्षर होण्यासाठी सक्ती करणे गरजेचे आहे. प्रत्येक सेवक व शाखा संगणकीकृत असलीच पाहिजे यासाठी संचालकांचा आग्रह असला पाहिजे.
  4. पतसंस्थेचा सेवक निर्व्यसनी, शिस्तबद्ध आणि प्रामाणिक असला पाहिजे. पतसंस्था ही बँकिंग पद्धतीने काम करत असल्यामुळे पतसंस्थेच्या सेवकांचा पैशाशी निगडीत किंवा अर्थकारणाशी निगडीत संबंध येत असतो. सेवक जर प्रामाणिक नसेल तर आर्थिक घोटाळे होण्याची दाट श्नयता असते. पतसंस्था ही स्थानिक लोकांनी सुरू केलेली आर्थिक संस्था असून, त्यामध्ये काम करणारे सेवकसुद्धा स्थानिकच असतात. आणि या परिसरातील सर्व ग्राहकांचा सेवकांवर पुर्णपणे विश्वास असतो. त्यामुळे पतसंस्थेचा सेवक हा अतिशय प्रामणिक असला पाहिजे. त्याचे हातून कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार होता कामा नये. ज्या पतसंस्था अडचणीत आल्या त्याचे जर बारकाईने निरीक्षण केले असेल तर असे दिसून येईल की, अडचणीत आलेल्या बऱ्याच पतसंस्थेमध्ये सेवकांनी आर्थिक घोटाळे केलेले दिसतात त्या पतसंस्था अडचणीत आल्या. त्यासाठी पतसंस्थेचा सेवक हा प्रामाणिक असला पाहिजे. पतसंस्थेच्या यशस्वीतेमध्ये प्रामाणिक, प्रशिक्षित व होतकरू सेवक असतील तर ती पतसंस्था निश्चित यशस्वी होवू शकते व असे सेवकच संस्थेच्या प्रगतीचे आधारस्तंभ ठरतात.

संचालक मंडळ

अ.नं.संचालकांचे नावपद
1श्री. डॉ. सोपान नामदेव चव्हाणचेअरमन
2श्री. श्रीकांत प्रभाकर शेटेव्हा. चेअरमन
3श्री. सुरेश गंगाराम साळुंखेसंचालक
4श्री. अशोक दिनकरराव लेंभेसंचालक
5श्री. रावसाहेब साहेबराव लेंभेसंचालक
6श्री. जयवंत गोजाबा घोरपडे संचालक
7श्री. भरत खंडेराव साळुंखे संचालक
8श्री. हणमंत बाबुराव निकमसंचालक
9श्री. तात्यासो निवृत्ती ढमाळसंचालक
10श्री. संजय सिताराम भोसलेसंचालक
11श्रीमती. सुलभा अरुण साळुंखेसंचालिका
12सौ. उषा अशोकराव पवारसंचालिका
13 श्री. गौतम गणपत कांबळे संचालक
14श्री. सतिश कोंडीबा बिचुकले संचालक
15 श्री. शशिकांत शंकर कुंभार संचालक
16श्री. नारायण शंकर सोनावणेतज्ञ संचालक
17श्री. सत्यवान सदाशिव मतकर तज्ञ संचालक